पावरा भातीभातीन गिदे
आजच्या आधुनिक युगात प्राचीन काळातील ग्रंथ, साहित्य, ऐतिहासिक साधने, कादंबरी, काव्य, महाकाव्य, महाकथा संदर्भ साहित्य, तसेच विविध मौखिक साधने, यांच्या आधारावर शिक्षण तसेच जीवनक्रम चालू आहे. यामधील काही घटक आधुनिक पद्धतीने विकसित करण्यात आलेले आहे. त्या संदर्भात आदिवासी पावरा जमातीच्या लोकांची पावरी भाषा स्वतंत्र लिपी नसल्याने ती प्रसिद्ध व प्रचलित झालेले आढळत नाही. ती एक पावरा लोकांमध्ये बोली भाषेचा स्वरूपात अस्तित्वात आहेत. सदर कविता पावरी भाषेत मी आपणास या पुस्तकाच्या माध्यमातून पावरी भाषेतील सामाजिक, सांस्कृतिक व जीवन संस्कृतीच्या दृष्टीने कवितेचे लेखन केले आहे. आदिवासी संस्कृती जतन करण्याच्या हेतूने निसर्ग देवत, कुलदैवत, प्रथा परंपरा, अभूषणे, हत्यारे, अवजारे, शैक्षणिक महत्त्व, संविधान कायदे, आदिवासी क्रांतिकारक व समाज सण उत्सव, जल जंगल जमीन, यांचे महत्त्व कवितेच्या माध्यमातून मोलाचा संदेश आपणास सादर करीत आहोत.