साहित्य वैभव
साहित्य ही मानवी जीवनाला उन्नत करणारी महत्वाची कला आहे. साहित्यातून मानवी जीवनाचे विविधांगी दर्शन घडते. प्रारंभापासूनच 'कथा' आणि 'कविता' हे दोन्ही वाङ्मयप्रकार माणसाच्या अधिक जवळचे राहिलेले आहेत. आपला जीवनानुभव व्यक्त करण्यासाठी माणसाने गोष्टीचा आधार घेतला. त्यातून कथा विकसित झाली. लोककथा ते आज लिहिली जाणारी अति लघुकथा हा कथेचा प्रवास विकसनशील स्वरूपाचा आहे. 'कविता' या वाङ्मयप्रकारातून आजवर सर्वाधिक लेखन झालेले आहे. मध्ययुगीन काळापासून आजतागायत कविता एक वाङ्मयप्रकार म्हणून अधिकाधिक परिपक्क होत आलेली आहे. मराठी साहित्य इतिहासात आपल्या कथा आणि कवितालेखनाने महत्वपूर्ण भर घालणाऱ्या निवडक लेखक-कवींच्या 'कथा' आणि 'कविता' प्रथम वर्ष पदवीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासता याव्यात; त्यांची वाङ्मयीन समज विकसित होण्यासाठी हातभार लागाया यासाठी अभ्यासपूर्ण विवेचन असणारा 'साहित्य वैभव' हा ग्रंथ निश्चितच महत्वाचा ठरेल...