मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास : एक आकलन
‘मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा अभ्यास’ या बी. ए. तृतीय वर्षाच्या विशेष स्तरावरील अभ्यासक्रमात इ. स. च्या १२ व्या शतकातील महानुभाव, वारकरी संप्रदायापासून १७ व्या शतकातील बखर आणि त्यानंतर शाहिरी वाङ्मयाचे साहित्यविषयक अवलोकन करणे हे प्रस्तुत अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट आहे. या काळातील मराठी वाङ्मयाचे सामर्थ्य शील आणि समृद्ध वाङ्मयाचे आढाव्याच्या रुपाने केलेली मांडणी विद्यार्थ्यांसमोर ठेवण्याचा मानस आहे.महानुभाव संप्रदायातील गद्य वाङ्मयासोबतच मध्ययुगीन काळात पद्य वाङ्मयाने समाजाची जडणघडण केलेली दिसते. सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक आणि व्यावहारिक अशा विविध अंगाने या काळात साहित्याचे लेखन झालेले दिसते. महानुभावीय पंचकृष्ण संतांची अभंगवाणी शाहिरांचे पोवाडे आणि लावणी यामधून तत्कालिन भाषेची वैशिष्ट्ये, तत्कालिन साहित्याचा समाजमनावर होणारा परिणाम, अनुभव समृद्धता, अध्यात्मिकता, मानसिक स्थिरता इ. गोष्टी परिणामकारकरितीने स्पष्ट होतांना दिसतात.