Online प्रेमाची Offline कहाणी
कचकचून चावणाऱ्या मुंगीलाही कुरवाळून सोडावं असं माझं मन, ONLINE OFFLINE चा विचार करताना फार चिडचिड करत होतं. तारखा बदलाव्यात तसा बदलत होता स्वभाव माझा. मी जळत होतो तरूण तपात ती धग कुणाला दिसत नव्हती आणि स्वप्नांची वांझोटी नक्षत्रे काळजाचा कोळसा कराया भिडत होती. अशा वेळी मला पुस्तकांनी सावरलं आणि मी मोबाईलकडून पुन्हा पुस्तकाकडे वळलो. मी मराठी विषयाचा विद्यार्थी. भाकरीच्या शोधात मराठी प्रदेश भटकताना झालो असतो पोटासाठी नक्षलवादी. पण सावरलं मला माझ्या युवा लेखणीने. माय म्हणायची 'जगमा निभे आसज राव्हो' आजही मी जगात निभण्यासारखाच राहतोय नी अडीच तपांची हयात जगून जातोय...