खान्देश कथाप्रबोध
‘खान्देश कथाप्रबोध’या संपादित पुस्तकात खान्देशच्या मातीतील कथाकारांच्या आशयघन कथांचा समावेश करण्यात आला आहे. याच कथांवर कथेचे आशयसूत्र, कथानक, व्यक्तिचित्रण, संघर्ष, जीवनचित्रण, भाषिक विशेषाच्या अंगाने विद्यार्थ्यांना सहज आकलन होईल आणि अभ्यासपूरक दिशा मिळेल, यादृष्टीने ‘खान्देश कथाप्रबोध ः आकलन आणि आस्वाद’ या नावाने समीक्षात्मक लेखन केले आहे. समीक्षेच्या अंगाने या कथांविषयीचे भाष्य किचकट करण्यापेक्षा, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सहज आकलन होईल अशा पद्धतीने या पुस्तकाची मांडणी करण्याचा मी प्रयत्न केला आहे.