शिवारप्रतिभा
कुणी प्रेम केलं तर प्रतिभेला मनापासून आवडतं. तथापि त्या प्रतीक्षेत ती कधीच नसते. पिकांचे हंगाम, दुःखांचे हंगाम, लोकांचे हंगाम आणि हंगामातले हर्षखेद प्रतिभेनं प्रत्यक्ष अनुभवलेले असतात. अशा मन प्रतिभेचा प्रज्ञावंत कवी, लेखक म्हणून डॉ. केशव सखाराम देशमुख यांचा लौकिक मराठी भाषेच्या मुलखात सर्वदूर आहे.
नको आपल्या स्वप्नांचे कुणा पापण्यांस ओझे आपल्याच वादळाचा दूर शंखध्वनि वाजे
असा स्वतःचा सूर घेऊन अभिव्यक्त होत आलेला आणि व्यक्त होऊ पाहणारा मराठीतील निर्मळ, नितळ निर्मिक केशव सखाराम देशमुख यांची वाङमयीन प्रतिमा उभी करणारं हे मौलिक संपादन आहे. बागुलांचा बिगूल • वाजला की मधुमिलिंद गंधातल्या गोडव्याच्या गोष्टी गुणगुणत गातो; तेच हे गीत: केशवाय नमः !
कधी मूर्ती मखर कधी बदलून काय होते
जाळावर तापलेल्या दुधाचीच साथ होते.
फ. मुं. शिंदे