राजकीय संत लोकसेवक मधुकरराव चौधरी
श्री. रवींद्र दिनकरराव संसारे यांचे ‘राजकीय संत लोकसेवक मधुकरराव चौधरी’ हे चरित्रात्मक पुस्तक त्यांच्या ओघवती आणि सोप्या भाषेमुळे सर्वसामान्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी, स्थानिक नेत्याची परिचयात्मक माहिती मिळविण्याच्या दृष्टीने खूपच उपयुक्त आणि महत्त्वाचे आहे. या चरित्रात्मक पुस्तकाचे वैशिष्ट्य हे की, लेखक स्व. मधुकरराव चौधरी यांच्या कुटुंबियांशी परिचित व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांना या संपूर्ण कुटुंबाचा जवळून आणि घनिष्ट परिचय आणि संबंध आहे. विशेष म्हणजे त्यांना मधुकरराव उर्फ बाळासाहेब यांच्याबद्दल प्रचंड आदर आणि आस्था आहे. त्यामुळे त्यांनी रेखाटलेले त्यांचे चरित्र पारदर्शक आणि चरित्रनायकाला न्याय देणारे झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे स्व. मधुकररावांचे सर्व पैलू त्यात रेखांकित झाले आहेत. लेखकाने स्व. मधुकररावांचे शैक्षणिक विचार, सामाजिक विचार, मौलिक विचार ठळकपणे अधोरेखित केलेली आहेत. तसेच स्व. मधुकररावांच्या शैक्षणिक पुनर्रचनेची पाच प्रमुख उद्दिष्टे ही ठळकपणे क्रमांक देऊन नमूद केलेली आहेत.