ओस पडल्या गव्हाणी
गाव, गोठा, गव्हाण या घटकांशी ग्रामीण कवितेचे एक जिव्हाळ्याचे नाते आहे. हे घटक त्याच्या गोत्रासारखे आहेत. शेती, शेतकरी आणि गावशिवा हा आत्मीय परिवार आहे. माणूस आणि झाड यांच्यात मुळातच एक अनुबंध आहे. यात्वात्मक परिभाषेत माणसाला ‘झाड’ संबोधले जाते. कारण माणसाची आत्मिक मुळेदेखील मातीतच रूजलेली असतात. तो कुठेली तरी त्याची नाळ या ग्रामशी जुळलेली असतात. ‘ओस पडल्या गव्हाणी’ या काव्यसंग्रहात ५२ कवितांचा संग्रह आहे. सर्व वाचनीय आहेत.