साहित्य क्षेत्रातील बहुआयामी व्यक्तिमत्व : अण्णाभाऊ साठे
अण्णाभाऊ साठे यांनी मानवी मनातील भावनांचे वास्तवदर्शी चित्रण करून शेवटच्या माणसांची वर्गीय व जातीतील सुख-दुःखे, राग-लोभ, आनंद-पश्चात्ताप, आशा-निराशा, संस्कृति-विकृती इ. ची मांडणी केली आहे. त्यांच्या साहित्यातून जीवननिष्ठा, भावनाविचार, चिंतनशीलता व मानवमुक्तीचा विचार प्रकर्षाने जाणवतो. सामाजिक समतेवर आधारीत नवा समाज निर्माण करणार्या क्रांतीकारी युगपुरूषांच्या जीवनकार्याचा अण्णाभाऊंनी नित्य नियमाने स्वीकार केलेला दिसतो.