पुनर्रचनेचे पडघम
पुनर्रचना, पुनर्मांडणी हा निसर्गाचा सर्वश्रेष्ठ सिद्धांत आहे. कोणतीही पुनर्रचनाही आत्मशोध, आत्मबोध, आत्मचिंतन आणि सचिकित्सा यांच्या आधारे स्वतःला मोडित काढून नव्याने निर्माण करण्याची प्रक्रिया असते. त्यासाठी वैश्विक मानवतावादी धारणांची पुनःस्थापना करावी लागते. बुद्ध, रसेल, जॉनड्युई, जोतिराव फुले आणि बाबासाहेब आंबेडकर या प्रज्ञावंतांची परिवर्तनशीलता, विज्ञाननिष्ठ विवेकपूर्ण विचार महत्त्वाचे ठरतात. या संदर्भात चिकित्सक अनुशीलन कसे उपयुक्त ठरते. याची प्रचिती प्रस्तुत लेखसंग्रहातून येते.