पालघर जिल्हा आदिवासी समाज लोकजीवन व लोकसाहित्य
‘पालघर जिल्हा ः आदिवासी समाज : लोकजीवन व लोकसाहित्य’ हा ग्रंथ पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील आदिवासी समाजाची बोली लोकगीते, लोकनृत्य, लोककला, लोकजीवन, लोकसंस्कृती, कुलदैवते अशा विविध घटकांचा वेध घेणारा हा संशोधनात्म्क ग्रंथ आहे. ह्या ग्रंथाच्या निमित्ताने प्राचार्य डॉ. भगवान राजपूत यांनी अत्यंत दुरावलेल्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडविले आहे.