काव्यांजली
‘सहज की उत्पाद्य’ या प्रतिभेच्या वादात न पडता हे कुणीही मान्य करेल की अशा कार्यशाळांमधून कवितेविषयक मूळच्या आंतरिक ओळीला अधिक मोकळीक वाट मिळत असते. आणि ही ‘अंतरीची मोल’ अधिक खुली करण्याचा एक चांगला प्रयत्न विद्यावर्धिनी महाविद्यालयाने मराठी साहित्य संस्कृती मंडळाच्या सहकार्याने केलाय, खानदेशातील कवितेवर निरसीम प्रेम करू पाहणार्या, कविता लिहू पाहणार्या मंडळींना एकत्र आणून ‘कवितेची कार्यशाळा’ घेऊन मराठी काव्यप्रांताला ही ‘काव्यांजली’ अर्पण केलीय.