अभिरानी
खान्देशच्या अहिराणी बोलीच्या जाणकार कवयित्री शकुंतला पाटील रोटवदकर यांचा अभिरानी हा कविता संग्रह अहिराणी बोलीभाषेचा सण, व्रत, धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचा कवितांमध्ये खान्देश संस्कृतीचे आचार विचारांचे दर्शन कवयित्रीने घडविले आहे. बोली भाषांनी मराठी प्रमाणभाषेला समृद्ध करण्याचं काम केलंय. अहिराणी भाषेचा गोडवा काही न्याराच आहे. आतिथ्य आणि अहिराणी बोली ही खान्देशी वैशिष्ट्ये आहेत. कवयित्रीने अहिराणीला राणीचे, राज्ञीचे पद बहाल केले आहे. लग्नसमारंभात म्हटल्या जाणार्या ओव्या, गीते, यांची लय भुरळ घालणारीच असते. शकुंतला रोटवदकर यांची ‘अभिरानी’ सांस्कृतिक श्रीमंतीने नटलेली आहे.