मराठी विज्ञान कादंबरीतील समाज जीवन
विज्ञानातील नवनव्या आविष्कारांमुळे मानवी जीवनाची घडी आज बदलत आहे. विज्ञानामुळे यंत्रे आली. सुखसोयी वाढल्या असल्या, तरी माणसाचा विवेक तुटत चालल्याचेही दिसतो आहे. निसर्गाचा समतोल तो नष्ट करतो आहे. त्यामुळे माणसाच्या अस्तित्वालाच एक धोका निर्माण झाला आहे. अशा वेळी विज्ञान कादंबरी वाङ्मय विज्ञानाची माहिती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा प्रचार करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतील; परंतु या उपयुक्त असलेल्या विज्ञान साहित्याची समीक्षा व संशोधन अजूनही मोठ्या प्रमाणावर होताना दिसत नाही.