मराठी विज्ञान कादंबरीतील संकल्पना आणि भाषणशैली
विज्ञान तंत्रज्ञानाने मानवी जीवन आज झपाट्याने बदलत आहे. मानवी जीवनाची घडीच जणू बदलत आहे. त्याची प्रस्थापित बैठकच जणू विस्कटून जात आहे. त्यांच्या मानसिकतेत आमूलाग्र बदल घडून येत आहेत. या सगळ्या बदलांचं भविष्यवेधी चित्रण या साहित्यात उत्कटतेने केलेले असते. त्यामुळे हे साहित्य जीवनाला धीटपणाने सामोरे जाण्याचे बळ देते. तसेच मनोरंजनाबरोबर अंधश्रद्धांवरही हे साहित्य सल्ला करते. म्हणून विज्ञान साहित्याचा अभ्यास करण्याची आज नितांत आवश्यकता आहे.