श्री गणेश स्तुती
प्रसिद्ध गणेशभक्त डॉ.तुळशीराम गुट्टे महाराज यांनी लिहिलेली ‘श्री गणेश
स्तुती’ साधकांना आणि भाविकांना उपयोगी आहे. श्री. महाराजांनी वर्षभर
श्रीगणेशानुष्ठान गोदावरीच्या पवित्र काठी केले. मौनात राहून त्यांनी
केलेली गणेशसाधना समाजकल्याणार्थ पोषक ठरली. विश्वमांगल्याच्या ध्यासातून
केलेली साधना मनाला आणि आत्मचिंतनाला उपकारक झाली. मौनकाळात श्री
महाराजांना जी काव्यस्फुरणे आली, त्यातून ‘श्रीगणेशस्तुती’ सहज अवतरली.