शांती
समाजातील विविध घडामोडी, सुष्ट-दुष्ट प्रवृत्ती, स्वार्थी वृत्ती आणि असंवेदनशील बनलेल्या प्रवृत्तींनानीट मार्गावर आणण्याचे कार्य पोलीस विभागातील बांधव करीत असतात. यादृष्टीने अनुभवांची परिपक्वता, संवेदनशील विधायकता आणि अभिव्यक्तीची आतुरता यामुळे कवी राजेंद्र रायसिंग यांच्या अनुभवांना शब्दरुपातील रचतेन साकारण्याचे बळ मिळते. त्या चिंतनशील आत्मनिष्ठेसह समष्ठीनिष्ठेेच्या भावना, विचार, कल्पनांना कवी साकार करतो. त्याची कविता होते. कविता, कला, सौंदर्यवादी अबोधता, दुबोधता अशा भावविश्वात न गुंतता सुबोध-सहज आणि सोप्या भाषेत जे आतून आले ते प्रकट केले, याभावनेतून त्यांची कविता पाहिली पाहिजे. मुळात राजेंद्र रायसिंग हे प्रशासकीय पोलीस अधिकारी असले,तरी सामाजिक बांधिलकीमुळे त्यांच्या मनातील संवेदनशीलता आणि मानवतावादी दृष्टीकोन या विचारांना सहभावातून जागृत करतात.