जयवंत दळवी यांचे विनोदी कथालेखन
जयवंत दळवींनी विनोदी कथा, कादंबर्या, नाटके, स्फूट लेखन, असे साहित्यप्रकार लिहिले आहेत. या पुस्तकात फक्त जयवंत दळवींच्या विनोदी कथांचे विश्लेषण केलेले आहे. जयवंत दळवींनी समाजाचे केलेले सूक्ष्म निरीक्षण व समाजाला दिलेले आत्मभान त्यांच्या कथांतून प्रतिबिंबित होते. समाजातील विविध प्रवृत्त्यांचे दर्शन त्यांच्या कथांतून होते व समाजाला योग्य दिशा देण्याचे काम त्यांच्या कथेने केलेले दिसते.