कोलदांडा
सुनील गायकवाड या तरुण तडफदार धडपड्या आदिवासी लेखकाचा ‘कोलदांडा’ कथासंग्रहातील अकरा कथा ग्रामीण जीवनाचे चित्रण रेखाटणार्या आहेत. ‘कोलदांडा’ कथासंग्रहात आदिवासी बोली भिलोरीतील संवाद, लोकजीवनातील अस्सल जिवंतपणा, ओघवत्या साध्या शब्दशैलीतून वाचकांच्या मनाचा ठाव घेतात. शालेय विद्यार्थ्यांना दिशा देणार्या ग्रामीण लोकजीवनाचे यथार्थ जीवनचित्र अगदी सहज शब्दांत अवतीभवतीच्या घटना, जे रोज भेटतात अशी विविध स्वभाववृत्तींची माणसे, पशुपक्षी हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग, त्यांच्यावरील प्रेम, समाजातील शांतताभंग करणारे दादागिरी करणारे गावगुंड, विविध स्वभावाचे लोक, एकूणच ‘कोलदांडा’ मनोरंजनासह वास्तविकतेचे मनोहारी तितकेचे वास्तवचित्र मांडणारा, विद्यार्थ्यांना, मोठ्यांना प्रेरणादायी संदेश देणारा सुंदर कथासंग्रह आहे.