शेवटची लाओग्राफिया
जादुई वास्तववादाला त्यापलीकडे जात त्याला एब्सरडिस्ट फिक्शनची जोड देणारी आणि कादंबरी लेखनाच्या सार्या प्रचलित धारणांना छेद देणारी व वाचताना अक्षरशः चक्रावून सोडणारी अपूर्व कादंबरी म्हणजे ‘शेवटची लाओग्राफिया’ कादंबरी होय. जादुई वास्तव आणि एब्सर्ड फिक्शनच्या एकदम वेगळ्या, अंगावर येणार्या प्रतिमांनी, कथानक व व्यक्तिचित्रणापेक्षा अभिनव कथनशैलीने नटलेली ही कादंबरी बौद्धिक रंजन करून वास्तवाला उजागर करणारी आहे.हा किमान मराठी साहित्यात तरी पहिलाच मस्त जमून आलेला एक नवा प्रयोग आहे. मराठीतील पहिल्या रांगेतील या कादंबरीचे जाणकार वाचक स्वागत करतील, हे नक्की!