गुर्जर बोलीभाषा साहित्य
खान्देशमं गुर्जर नावनी एक जात सं. गुर्जर जातने अनेक पोटजातो सतेस, रेवा गुर्जर, लेवा गुर्जर, दोडे गुर्जर, गहरी गुर्जर, अहिरी गुर्जर, सूर्यवंशी गुजर, बडगुजर इत्यादि. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गना पूर्व भागमं जे गुर्जर समाज रहस तिसने बोलीभाषानं गुर्जर बोलीभाषा म्हनतस अनं त्या भाषामं अहिराणी भाषानो प्रभाव सं. पश्चिम भागमं जे गुर्जर समाज रहस तिसने बोलीभाषामं गुजराथी भाषानो प्रभाव सं. गुर्जर समाज हाई शेती आनं पशुपालन करणारो समाज सं. तिनामुळे गुर्जर समाज हे तापी, नर्मदा आनं तेंने उपनदेसना काठवर वसेल सतस. तसो गुर्जर समाज हे लढावू वृत्तीनो, क्षत्रीय, प्रतिष्ठित समाज सं. ई. सन. ५०० शतकमं गुर्जर साम्राज्य स्थापन व्हयेल व्हतू. खान्देश मधला गुर्जर राजस्थान, गुजराथ मार्गे महाराष्ट्रमं स्थलांतर व्हया अन् तापी, नर्मदा आनं तेंने उपनदेसना काठवर वसाहत करी. पुर्वीना काळमं मिहिरभोज, महिपाल सारखा खूप मोठा मोठा सम्राट हुयी गया. गुर्जर बोलीभाषावर अहिराणी भाषानो प्रभाव जरी असे तरी तिन्ही आपली अशी ओळख सं. भाषामं गोडवो सं, एकमेकांप्रती आदर सं. आपला गुर्जर बोलीभाषामं सुद्धा अनेक स्त्रि-पुरुष अलंकारीक पद्धतनू बोलतांना दिसतंस.गुर्जर बोलीभाषामं कविता, गाना, लेख, विनोद, लघुकथा इत्यादि साहित्य लिहिणारा साहित्यीक सतसं.