वाणिज्यसुधा
संस्कृत भाषेत अनेक विद्याशाखांना प्रेरणा देणारे समृद्ध वाङ्मय उपलब्ध आहे. या वाङ्मय परंपरेची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी आणि त्याद्वारे त्यांना त्या भाषेमध्ये रुची निर्माण व्हावी या उद्देशाने हे पुस्तक तयार करण्यात आले आहे. या पुस्तकात वाणिज्याशी संबंधित विविध विषयांवरील एकूण सोळा उतारे निवडण्यात आले आहेत आणि प्रश्नावलीचाही अंतर्भाव केला आहे. शिवाय कौशल्यावर आधारित असणार्या पाठ्यक्रमासंदर्भात सूचक घटकांचा ही समावेश या पुस्तकात केला आहे. सरलता व सर्वसमावेशकता ही संस्कृत भाषेची वैशिष्ट्ये जपण्याचा प्रयत्न हे पुस्तक करताना केला गेला आहे.