माझा जीवनप्रवास
जगणं सुंदर आहे. जीवन सुंदर आहे. असं श्वासागणिक म्हणणाऱ्या अशोक चौधरींचं बालपण ते तरूणपण येथपर्यन्तचा प्रवास अतिशय कष्टप्रद व संघर्षमयी होता. पण संकटं हा आयुष्याचा एक भाग असतो हा विचार डोळ्यात अन् मनात आणून संकटांना परतवून लावण्याचे या माणसाचे धारिष्ट्य असामान्यच म्हणावे लागेल. पाच भावंडं, सर्वात मोठा भाऊ म्हणून स्वतःहून जबाबदारीचं सारंच गाठोडं बिनदिक्कत स्वतःच्या डोक्यावर घेत पितृछत्र हरवलेल्या या मुलानं कुटुंबप्रमुखाच्या पदाला आजपर्यन्त या क्षणापर्यन्त न्यायच दिला.माणूस किती जगला ? यापेक्षा कसा जगला? हे महत्त्वाचं असतं. 'माझा जीवन प्रवास हे श्री. चौधरी सरांचं आत्मकथन 'येणाऱ्या वाचक पिढ्यांना प्रेरणादायी ठरणार असून आयुष्य सुसह्य करण्यास कामी येणार आहे. त्यांच्या या लेखन प्रकाशनात माझे दोन शब्द कामी आले याचा मला मनस्वी आनंद आहे. त्यांचा पुढील आयुष्य प्रवास व लेखन प्रवास सुखाचा व सर्वार्थाने समृद्धीचा होवो या आभाळभर शुभेच्छा देत मी त्यांना सुयश चिंतितो.
- प्रा. वा. ना. आंधळे