लेखन कौशल्ये :निबंध आणि ग्रंथ परीक्षण
आजच्या काळात कौशल्यांना महत्त्व प्राप्त झालं आहे. या विविध कौशल्यांमध्ये निबंध लेखन आणि पुस्तक परीक्षण समावेश होतो. वाङ२मय निबंध ही संकल्पना काटेकोर शब्दांमध्ये व्ये करणे अशक्य आहे. एखाद्या विषयासंबंधी स्पष्टीकरणार्थ केलेले सुबोध विवेचन म्हणजे वाङ२मय निबंध होय ही सुप्रसिद्ध समीक्षक रा.ग.जाधव यांनी केलेली व्याख्या अतिशय सुस्पष्ट वाटते. वाङ२मय निबंध लेखन म्हणजे आत्मस्पष्टीकरणाची एक सुंदर संधी असते. निबंध लेखनातून तो विषय संपूर्णपणे आपणास समजला आहे की नाही हे अजमावण्याचा प्रयत्न विद्यार्थी करीत असतो त्या विषयाचा एक एक पैलू उकलून पटवून देण्याचा प्रयत्न निबंध लेखनातून विद्यार्थी करीत असतो. निबंधाची संकल्पना आणि स्वरूप विद्याथ्यारना समजावून देण्याचे कौशल्य अध्यापकांना करावे लागते. विद्यार्थी आणि अध्यापक या दोघांना. डोळ्यासमोर ठेवून या पुस्तकाची मांडणी केली आहे.