भाषा आणि संस्कृती
ग्रंथातील काही लेखांतून शिक्षणाविषयीची मीमांसा आणि शिक्षण देणार्या संस्थांसंबंधी विश्लेषण ‘भाषा आणि संस्कृती’ या ग्रंथामध्ये करावयाचा प्रयत्न केलेला आहे. आजच्या साहित्याची दिशा, साहित्यातील श्रमसंस्कृती, साहित्याचा उत्कर्ष, साहित्य आणि गांवशिवार, वाचनसंस्कृती आणि साहित्य तसेच साहित्यव्यवहार आणि साहित्यिक मनोभूमिका हे सहा लेख साहित्याच्या भूमीविषयी चिंतन प्रकट करणारे तसेच साहित्यभान व्यक्त करणारे लेख आहेत. ग्रंथाच्या अखेरीस माझ्या सर्जनशील लेखनाच्या अनुरोधाने माझी विविधांगी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला आहे. एक लेखक समजून घेण्यासाठी या लेखाचे काहीसे सहाय्य होईल असे मला वाटते.