धाडस
“तळागाळातल्या गरीब वंचित बांधवाची सेवा करतो.” या उदात्त भावनेने एकदा वैद्यकीय पदवी घेतली की बिमारांचे, मजलूमांचे चामड्यासहीत खिसे कापायला आपण मोकळे झालोत हा विश्वास मनात घेऊन या क्षेत्रातील मोजता येणार नाहीत इतके वैद्यकीय महानुभाव महाल, गाड्या, जमीन जुमला घेऊन सपशेल मोकळे. हे आजचे आपले समाज वास्तव आहे. दवाईवाल्यांचे तर विचारूच नका. पाच पैशाला निर्माण होणारी दवाईची गोळी अर्थात ‘टॅबलेट’ कितीतरी रुपयाला ‘प्रोडक्शन ऑफ कॉस्ट’ चे जे आहेत ते नियम धुडकावून मनमाने बिमाराच्या गळ्यात उतरवली जातेे. यात शेवटचा गरीब माणूसच बळी पडतो. हे सर्व मनाला न पटणारे वैद्यकीय समाज वास्तव बघितले की, खूप वाईट वाटते. सगळे बांधव हतबल होऊन जातात, अशा वेळी डॉ. के. के. मोरेंसारखे फरिस्ते आशेचा किरण होऊन जातात. डॉ. मोरे सर आपलं एकदा मिळणारं अनमोल जीवनच ते निर्व्याजपणे दुःखीतांच्या सेवेसाठी वाहून घेतात. हे त्यांचं ‘धाडस’ बघून कुठलाही सहिष्णू माणूस त्यांना सलाम केल्याशिवाय राहणार नाही...!
- लोकनाथ यशवंत