मनाच्या व्यथा
गावापासून राष्ट्रापर्यंत आणि राष्ट्रापासून विश्वापर्यंतची जीवन जाणीव या ङ्गमनाच्या व्यथाफ या काव्यसंग्रहात व्यक्त झालीय. अन्याय अत्याचारी धर्म-संस्कृतीबद्दलचा सात्विक राग-संताप या कवितेत आहेच. तो स्वाभाविक आणि समर्थनीय आहे. पण विद्रोहाला विवेकाची जोड देण्याचे कर्तृत्त्व पुष्पा साळवे यांनी केलंय. म्हणून जन्मस्थान गाव आणि देश सुंदर रूपात त्यांना दिसला. ही उदार व सहिष्णू भूमिका बुद्धांच्या प्रकाशातच कवयित्रीने पचवली. पुष्पा साळवे करुणामयी धम्माच्या संस्काराने संस्कारीत आहेत. म्हणूनच त्यांचा कळवळा विश्वाला भिडतो. त्यांच्या मनाच्या व कवितेच्या परिप्रेक्षात विश्वजाणीव पेरली जाते. विश्वकल्याण, विश्वशांती, विश्वमानवता कवेत घेणारी त्यांची कविता छत्रपती महामानव आणि बुद्धत्वाला बेरजेत स्विकारते. संचिताची सत्याची, मानव कल्याणकारी बेरीज पुष्पा साळवे यांच्या कवितेचे खास वैशिष्ट्य आहे. पुष्पा साळवे यांचे या ३४५ क्रमांकाच्या प्रस्तावनेत हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.
- डॉ. श्रीपाल सबनीस
८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
अध्यक्ष, पिंपरी पुणे