निष्काम कर्मयोगी
प्राचार्य प्रमोद पवार सरांचे संघटन कौशल्य अतुलनीय आहे. मनमिळाऊ स्वभाव, ऐकून घेण्याची वृत्ती, सहकार्याचा भाव यामुळे त्यांचा मित्र परिवार सर्वदूर आढळतो. सुसंस्कृत कुटुंबातून आल्यामुळे त्यांनी आपल्या कुटुंबीयांचे चांगले संगोपन केले आहे. सुविद्य पत्नी, एक मुलगा, एक मुलगी हा एकल परिवार सांभाळून ते जळगाव येथे स्थायिक झाले. त्यांच्या मृदू स्वभावामुळे त्यांना अनेक मित्र मिळाले. पवारसर यशस्वी होण्यात एकमेव गमक मला वाटते ते म्हणजे निःस्वार्थी, पारदर्शी, मैत्रीपूर्ण भाव कायम राखून त्यांनी केलेली वाटचाल. यामुळे ते 'अजातशत्रू' ठरले.
प्राचार्य प्रमोद पवार सर आणि त्यांचे कुटूंबीय यांना निरामय भविष्यकाळ लाभो ! य त्यांनी निवृत्तीनंतर एक समाजसेवक म्हणून समाजसेवेचे व्रत स्वीकारावे, अशी आशा व्यक्त करतो.