वैशालीची आम्रपाली
साहित्यलेखन म्हणजे दुसरे तिसरे काय असते? लेखकाची जडणघडण समाजात झालेली असते. त्याला आलेले जीवनानूभव तो साहित्यात अविष्कृत करीत असतो. विशेषत: बुद्धविचार आणि आंबेडकरी विचारांचे भान असलेल्या व्यक्तीकडून तर नेहमीच उदात्त, व्यापक विचारांची पेरणी झालेली असते. अशा व्यापक, उदात्त विचारांच्या प्रसारासाठी प्रल्हाद खरे यांच्याकडून ‘वैशालीची आम्रपाली’ या कथासंग्रहाची निर्मिती झाल्याचे एकूण त्या कथासंग्रहातील कथा वाचल्यानंतर लक्षात येते.‘वैशालीची आम्रपाली’ ह्या कथासंग्रहातील कथा बौद्ध तत्त्वज्ञान, बुद्धाचे अहिंसावादी मानवतावादी विचार व्यक्त करणार्या आहेत.