महाभारत द लाइफ स्किल्स मंत्रास
‘महाभारत’ म्हणजे केवळ कौरव-पांडवांचं युद्ध, धर्म आणि नीतीविरुद्ध अधर्म व अनीती, स्वार्थ, सत्तांधता, दमननीती यातील संघर्ष नाही. कृष्णानं अर्जुनाला प्रेरित करण्यासाठी सांगितलेला गीतोपदेश एवढाच अर्थ त्यात दडलेला नाही. तर या थोर ग्रंथातील त्या त्या पात्राकडून काय शिकायला मिळतं, याचं सखोल, अभ्यासपूर्ण विवेचन वर्षा परगट लिखित “महाभारत” द लाईफ स्किल्स मंत्रास् या पुस्तकात वाचायला मिळते.लहान-थोरांना ‘ल म्हणजे बर्थ (जन्म) आणि व म्हणजे डेथ (मृत्यू) या दरम्यान असलेलं अंतर म्हणजे आयुष्य, जीवन किंवा जगणं. ते कसं जगावं हे या पुस्तकाच्या माध्यमातून शिकायला मिळतं.
द्रौपदीचे दु:ख, यातना व अपमान बघून श्रीकृष्णानेही प्रतिज्ञा घेतली, द्रौपदी तुझ्या अपमानाचा बदला मी जरूर घेईल. या अत्याचारांची परतफेड कौरवांना युद्धाच्या रूपात करावी लागेल. तुझ्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू आग बनेल आणि कौरवांचे मृतदेह तू युद्धात बघशील.
महाभारतातून जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन मिळतो. वर्षा परगट यांच्या या पुस्तकातून नवीन पिढीसाठी उद्बोधक व मार्गदर्शक विचार सहज, सोप्या भाषेतून वाचायला मिळतात.