आबा : माणसातला देवमाणूस
तोच दिवस, तीच तारीख, तीच तिथी आणि सोबत दाटलेल्या असंख्य आठवणी....कसं लिहावं सुचत नाही पण तुमची उणीव प्रकर्षाने जाणवते. तुमचे चरित्र लिहीतांना एका पानापेक्षा जास्त डबडबलेल्या डोळ्यांनी लिहूच शकत नाही. त्याकाळी आजच्या सारखे प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते त्यामुळे तुम्हाला टिपता आलं नाही. तुमचा कणखर आवाज मोबाईलमध्ये कैद करता आला नाही ही गोष्ट मनाला टोचते. आयुष्य कसं जगावं आणि जगू द्यावं हे तुम्ही शिकवलत आवा. माणूस कसा असावा आणि माणुसकी कशी असावी हे तुमच्याकडून कळाले. तुम्ही दाखवलेल्या वाटेवरुन मला चालायचं आहे. तुम्ही दिलेल्या शिकवणीतूनच हे जग जिंकायचे आहे. तुमचं असणं हेच सर्वकाही होतं...!