सलाम
समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे वृत्तपत्रांच्या माध्यमातून ‘देशभक्ती व सामाजिक’ विषयांवर कविता पाठवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यास उत्तम प्रतिसाद लाभला. महाराष्ट्रातून प्राप्त झालेल्या कवितांमधून प्रतिनिधिक कवितासंग्रह - ‘सलाम’ संपादित करण्यात आलेला आहे. वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या या संग्रहात नवोदितांपासून नामवंतांपर्यंत महाराष्ट्रातील सुमारे २७ जिल्ह्यांतील कवींच्या कवितांचा समावेश आहे.सलाम काव्यसंग्रह मनोरंजनासाठी नाही. तर स्वातंत्र्यलढ्यात प्राणार्पण करणार्या क्रांतीवीरांच्या स्वप्नांची आठवण करून देणारा, समाजातील ज्वलंत प्रश्न मांडणारा हा काव्यसंग्रह आहे. सलाममधील कविता ही विचार करायला लावणारी, कृतीशील बनवणारी आहे.