एक्सलेन्स फॉर सक्सेस
प्रत्येकाजवळ काही ना काही शक्ती निसर्गाने दिली आहे. ती शक्ती जो ओळखतो, तो जीवनात प्रगतिमार्गावर जातो. आज अनेक सुशिक्षित तरुण जीवनात योग्य संधीची वाट बघत बसतात. संधी कधीच चालून येत नाही, ती तुम्हाला निर्माण करावी लागते. योग्य वेळी योग्य निर्णय जेव्हा घेतला जातो, तेव्हा ती संधी बनते. आपल्या अंगी उत्कृष्टता बाळगणारे अशी संधी निर्माण करून घेतात. आज संपूर्ण जग हे उत्कृष्टतेच्या मागे धावत आहे. यशाच्या शिखरावर जाण्याची ज्यांची महत्त्वाकांक्षा आहे, ते सतत उत्कृष्टतेचा ध्यास घेतात. असे महत्त्वाकांक्षी लोक परिपूर्णतेच्या ऐवजी उत्कृष्टतेवर भर देतात. कारण, कुणीही या जगात परिपूर्ण होऊ शकत नाही. प्रत्येक वेळेला सुधारणा हवी असते. हा नियम जो पाळतो, तो सतत उत्कृष्ट बनत राहतो. ही उत्कृष्टता कशी साधायची, याचा विचार प्रस्तुत पुस्तकात विस्तृतपणे केला आहे.