शूद्र ते शूद्रमुक्ती
शुद्र या संवर्णात लोटलेले लोक हे मुळ भारतीय तर होतेच ते लढवैय्ये राजे, सार्वभौम सत्ता असलेले राजे होते. संस्थानिक होते. त्यांच्यातील कोणी ही त्याचा देशाभिमान, लादलेली गुलामगिरी यांची जाणिव करून देऊन स्वातंत्र्याची मागणी करून आपल्या विरोधात उठाव करू शकतात याची जाणीव आर्यांना असल्याने शुद्र हे कायम दास्यात राहावे, स्वातंत्र्याची जागृती त्यांच्यात होऊ नये म्हणून त्यांचे पौरोहित्यच ब्राह्मणांनी नाकारले. त्यांच्या वस्त्या गावाच्या वेशीच्या बाहेर गावाचे पूर्व दिशेला हाकलून लावल्या आणि पुढे जाऊन त्या वस्त्यांना शुद्र, नाम शुद्र, अंत्यज, चांडाळ, अछुत असले संबोधन मिळत गेले. पुढेपुढे त्याच वस्त्याचे नामकरण प्रदेश परत्वे महार, बल्हाई, धेड, दास, परिहार, पेरियार यासारख्या वेगवेगळ्या नावाने आज परिचित आहे. ही नावे प्रातिनिधिक आहे. यापेक्षा अनेक प्रकारची नावे आहेत.
(प्रस्तुत पुस्तकातून...)