प्रति (पत्री) सरकारचे निर्माते क्रांतिसिंह नाना पाटील
प्रतिसरकारचे निर्माते, क्रांतिसिहं नाना पाटील यांचे चारित्र्यावर व पराक्रमावर लेखक व वक्ते बी. आर. पाटील यांनी आपले चारित्र्य व कार्य नाना पाटलांप्रमाणे शाकाहारी, निर्व्यसनी, स्वच्छ असे जोपासले आहे. त्यांनी क्रांतिसिंहांवर महाराष्ट्रात २०१७ पासून गावोगावी व्याख्याने एकही रूपया न घेता पदरमोड करून दिलीत. तसेच विद्यार्थ्यांसाठी आपल्या मूळ गावी वित्तदान ही केले. २०१७ पासून क्रांतिसिंहांचा ३ ऑगस्ट हा जन्मदिन पदरमोड करून साजरा करीत आहेत. क्रांतिसिंह नाना पाटलांनी आपली शेतीवाडी व घरदार वडिलोपार्जित जमिनजुमला आपल्या मागे आईचा सांभाळ करावा म्हणून, त्यांचे लहान भाऊ दादा पाटील व ज्ञानू पाटील या दोघांत वाटणी करून दिली होती त्याप्रमाणे बी. आर. पाटील यांनी वडिलोपार्जित जमिनजुमला आपल्या ४ लहान भावांना देऊन टाकले. श्री. बी. आर. पाटीले हे आजही भूमिहीन आहेत. आपण ज्या चारित्र्यावर लिहितो, बोलतो तेच आपण वागावे. बोले तैसा चाले, त्याची पाऊले वंदावी असे व्यक्तिमत्त्व लेखकाचे मन भाराऊन टाकणारे आहे. क्रांतिसिंह नाना पाटलांप्रमाणे श्री. बी. आर. पाटील यांची साधी राहणी व उच्च विचार, देशसेवा मनाला चकीत करणारी आहे. त्यांचे हे पुस्तक नवीन पिढीला चांगल्या जडणघडणीत उपयोग पडेल याचा मला विश्वास वाटतो.