वाणिज्यसुधा भाग २
प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये संवादकौशल्य, श्रम करण्याची इच्छा आणि क्षमता आणि चांगल्या मार्गाने संपत्ती मिळवून दान करण्याची वृत्ती वृद्धिंगत होणे ही आजच्या काळाची गरज आहे. आधुनिक युगाची ही गरज लक्षात घेऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील मार्गदर्शक तत्त्वे डोळ्यासमोर ठेऊन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावतीच्या संस्कृत अभ्यासमंडळाने 'वाणिज्य सुधा २' हे पुस्तक संपादित केले आहे. या पुस्तकामध्ये सरस, सुबोध आणि विश्वमनोज्ञ अशा अमृतमयी संस्कृत भाषेतील एकूण सोळा उतारे निवडण्यात आले आहेत. विविध विषयांवरील या पाठांमध्ये प्राचीन व अर्वाचीन संस्कृत साहित्यातील ग्रंथरत्नांचा समावेश केला आहे. वाणिज्य विषयाशी निगडीत काही संस्कृत पाठांचाही अंतर्भाव सदर पुस्तकात करण्यात आला आहे. यामुळे भविष्यकाळात विद्याथ्यांना आंतरविद्याशाखीय संशोधनाकडे वळण्याची प्रेरणा मिळू शकेल.