बहिणाबाईंची गाणी - मोडी आणि मराठी
मध्ययुगीन काळात विविध स्वरुपाचा मजकूर लिहिण्यासाठी, व्यवहारासाठी मोडी लिपीचा वापर होत होता. त्या काळातील कार्यालयीन कागदपत्रे मोडी लिपीतच लिहिली जात होती. आजही अनेक प्रकारचे ऐतिहासिक संदर्भ समजून घेण्यासाठी मोडी लिपीतील कागदपत्रे उपयुक्त मानली जातात. अलीकडच्या काळात अनेक शासकीय निमशासकीय कार्यालयात असलेली जुनी मोडी लिपीतील कागदपत्रे लिप्यंतरित करणे ही काळाची गरज बनली आहे. म्हणूनच या लिपीला अधिक महत्व आहे.