डॉ अक्षयकुमार काळे समीक्षेची समीक्षा
डॉ. अक्षयकुमार काळे हे मराठीतील साहित्य संशोधन क्षेत्रात एक गंभीर आणि व्रतस्थ काव्य समीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी नव्या जुन्या मराठी कवीच्या काव्यातील सौंदर्यस्थळे शोधण्याचा आस्वादक परंतु वस्तुनिष्ठ प्रयत्न जसा केला तसाच त्या काव्याच्या प्रेरणांमागील सांस्कृतिक अनुबंध शोधण्याचाही यशस्वीप्रयत्न केला. कवी किंवा लेखकांचे जसे साहित्यविश्वाला योगदान असते, तसेच ते समीक्षकाचेही असते. हे गृहीततत्त्व धरून डॉ.गणेश मालटे यांनी प्रस्तुत ग्रंथात डॉ. काळे यांच्या एकूण समीक्षा व्यवहाराची चिकित्सा केली आहे.