सैराट नावाचे वादळ
जातीबद्ध बेगडी-कृत्रिम प्रेमाऐवजी काळजातून जन्मलेल्या नैसर्गिक प्रेमाची आंतरजातीय नाट्यात्म कथा सैराटने जगभर पोचवली. या ऐतिहासिक कलागृतीचा विविधांगी शोध घेवून किशोर सुर्यवंशी यांनी समर्थपणे मुल्यमापन केलेय. संरजामी जात वर्चस्वातून उदयास आलेले ग्रामीण सत्तावास्तव, जात श्रेष्ठत्वासाठी बेटी बंदी आणि स्त्रीयांवरील पुरूषी नियंत्रण, अशा अमानुष कुरूपतेविरूद्ध परशा व आर्चीचा विद्रोह उदयास येतो. नागराज मंजुळेंच्या सैराटचे विस्फोटक, कलात्मक रसायन आणि जगभरात पोचलेले ‘झिंगाट’मय ‘याड’, किशोर सुर्यवंशी यांनी विविधांगांनी तपासून पचविल्याची ही साक्ष मराठी कलाविश्वासाठी गौरवास्पद आहे.