रंग हळव्या मनाचे
प्रस्तुत कथासंग्रहात ‘मोबदला’, ‘बदल’, ‘खंत’, ‘पश्चात्ताप’, ‘चूक’, ‘दिशाहीन’, ‘नाते’, ‘पणत्या’, आणि ‘प्रेम’ या नऊ गोष्टी आहेत. या सर्व गोष्टींतील कथाबीजे ‘हळव्या मनाशी’ गुंफलेली आहेत. कथाबीज फुलवित नेण्याची त्यांची हातोटी कुशल आहे. ठसठशीत पात्रे, त्यांचे स्वभाव, त्यांचे परस्पर संबंध, त्यांच्यात घडणारे संवाद, त्या संवादातून व ओघवत्या निवेदनातून विकसित होत जाणारे कथाबिज हे सगळेच मोठे रमणीय व आकर्षक आहे.