गाभा
केशव देशमुख यांच्या ‘गाभा’ काव्यसंग्रहामधील कविता इथल्या शोषण परंपरेविषयी बोलते. विशेषतः जागतिकीकरणोत्तर काळात जी एक प्रकारची सार्वत्रिक विघटनाची प्रक्रिया सुरू झाली, ज्यामुळे श्रमिक आणि कष्टकर्यांचे भावविश्व झाकोळून गेले. अशा उद्ध्वस्त आणि अर्थशून्य आयुष्याला ही कविता उजागार करते. आधुनिकीकरणामुळे मूळ चेहरा हरवलेला माणूस आणि शेती हा या काव्यसंग्रहाचा केंद्रवर्ती ‘गाभा’आहे. शतकानुशतके जो समूह इथल्या माती आणि संस्कृतीशी एकरूप झालेला आहे, परंतु त्याया आयुष्यातील दाहक वास्तवता जराही कमी झालेली नाही. अशा कुणबी कुळाचा प्रतिनिधी असलेले केशव देशमुख यांचा हा काव्यसंग्रह ग्रामजीवनातील विविध स्थित्यंतरांचा समर्थपणे वेध आहे.