उमेदकार
खरं म्हणजे सहज भावनांना कवितेचा शब्द आणि मनांतल्या सहजतेला विचाराचं कोंदण चढवणारी ‘उमेदकार’या काव्यसंग्रहातील कवी -रंगराव पंढरीनाथ बारी यांची कविता मनभावक आहे. सदाचारांचा सुगंध धारण केलेली ही कविता जशी चटकन कळते, तशीच ही कविता तिच्यातील आंतरिक सुगमतेमुळे कोणत्याही वाचकाला मनोमन आवडतेही. हाच नेमका या कवितेचा सद्गुण म्हटला पाहिजे.