तौलनिक साहित्याभ्यास आणि मराठी साहित्य
भारतीय साहित्याच्या विशाल परिप्रेक्ष्यात मराठी साहित्याचा तौलनिक विचार करून त्याच्या बलस्थानांची आणि सृजन प्रकियांची चिकित्सा करणे हे या पुस्तकाचे स्वरूप. भारतीय संत साहित्याचे स्वरूप आणि त्याचा आवाका भारतीय भाषांमध्ये कादंबरीचा उदय, साहित्यातील सहनिर्मितीचे स्वरूप, गंभीर साहित्य आणि लोकप्रिय साहित्य यांतील परस्परसंबंध, नामदेवांचा व ज्ञानेश्वरांचा काव्यानुभव, मर्ढेकरांची समीक्षा, इंदिरा संतांची प्रतिमासृष्टी, बाबूराव बागुलांची कथा... साहित्यगंगेच्या प्रवाहाची विविध रूपे आणि घाट यांचा वेध निशिकांत मिरजकर यांनी सजगतेने आणि रसिकतेने घेतलेला आहे. निशिकांत मिरजकर यांनी समीक्षा स्वागतशील आणि साहित्याच्या अनेकतेला न्याय देणारी असल्यामुळे पूर्वग्रहरहित आणि बंधनमुक्त आहे. मराठी समीक्षेला एक नवे सहृदय परिणाम देणारी आहे.