पौर्णिमेची चंद्रकोर
भावनेच्या भरती-ओहोटीत शांत सागर खवळला. आसवलाटांच्या रूपाने किनार्यांवर वारंवार आदळला. सागरलाटा व सागरकिनार्याचे अतूट नाते ओक्साबोक्सी रडले. भावनांचा महातांडव झाला. माय-बाप जिवंत असुनही रूपालीला पोरके जीवन जगणेच नशीबी आले. निरागस, निष्पाप, निर्मळ, अजाण रूपाली कुटुंबाला पारखी झाली. भावंडांना मुकली. आजही सुमित्राचे मन अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा प्रवास निराकार भावनेने न्याहाळते. निसर्गातील अंधार सरत जातो. उजेडाची कास धरत पण सुमित्राच्या मनात अंधार वाढत जातो. उजेड मिटत जातो. तिच्या चंद्रकोरासाठी तिचेहृदय भरून येते.