वय कोवळे उन्हाचे
प्रत्येकाच्या मनात आपले बालपण आणि एक लहान मूल दडलेले असते ; परंतु जसजसे आपण प्रौढ होत जातो, तसतसे एक गंभीर आवरण पांघरून समाजात वावरावे लागते. असे असले तरी आतले खेळकर मूल काही स्वस्थ बसत नाही. आपले रूट्स नेहमी आपणास मागे बालपणात खेचत असतात आणि असा जेव्हा आपण आपल्या मुळाकडे प्रवास करतो, तेव्हा मनाच्या गाभार्यातून प्रकाशित होतात ‘ती कोवळी उन्हे !’ हे लेखन म्हणजे त्याचेच प्रत्यंतर.