काटेरी पायवाट
सामान्य मुलापासून तर प्राध्यापकी पेशापर्यंत मजल मारणार्या एका विद्यार्थ्याचा संघर्ष डॉ.अनंता सूर यांच्या ‘काटेरी पायवाट’ या आत्मकथनात येतो. ही आयुष्याची पायवाट कमी अधिक प्रमाणात प्रत्येकाच्या वाट्याला येत असते ती तुडवून प्रत्येकाने आपली वाट निर्माण करावी. हे आत्मकथन मराठी साहित्यात एक वेगळा ठसा उमटवेल व अशा हजारो शिक्षणाविषयी उदासीन होणार्या मुलांना शिक्षण घेण्याची नवी प्रेरणा देईल यात दुमत नाही.