शब्दवेल
कवितेतून व्यक्त होणारा कवी आपल्या सामाजिक, सांस्कृतिक, वास्तव अनुभवातून व्यक्त होत असतो. हे व्यक्त होणं म्हणजेच सामाजिक, सांस्कृतिक संतुलन योग्य दिशेनं नेणं होय. ही सामाजिक संतुलनाची शिस्त आपल्या कवितेतून मांडणारे कवी घनश्याम भुते यांचा ‘शब्दवेल’ हा कवितासंग्रह समाजभान जपण्याबरोबरच सभोवतालच्या वातावरणाला दूषित करणार्या वृत्तीला लगाम घालणारा असाच आहे.