खान्देशातील महार संस्कृती
ज्येष्ठ कथाकार, कादंबरीकार आणि अभ्यासक रा. शे. साळुंके यांना खानदेशातील अस्पृश्य मानले गेलेल्या ‘महार’ समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचा शोध घेण्याची निकड वाटली आणि त्यास कादंबरीचे स्वरूप देऊन त्यांनी महार संस्कृतीचा शोध घेतला. चिंचोली हे गाव निमित्तमात्र असले, तरी सामाजिक, भौगोलिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून एका समाजाच्या स्थितिशीलतेकडून परिवर्तनाच्या दिशेचा साळुंके यांनी घेतलेला वेध अभ्यासपूर्ण आहे आणि अभ्यासकांना संदर्भमूल्य म्हणून उपयुक्त आहे.