संचिताचे शारंगपाणि
‘संचिताचे शारंगपाणी’ या अनोख्या शीर्षकाने प्रकाशित होणारा प्रा. डॉ. मार्तंड कुलकर्णी यांचा हा लेखसंग्रह नव्या आशयविषयांना स्पर्श करणारा आणि संतपरंपरेच्या साहित्याचा व्यापक पट डोळ्यांसमोर ठेवणारा आहे. त्याची चौकट मध्ययुगीन संतपरंपरेशी निगडित आहे. असे दिसत असले तरी काळाच्या दृष्टीने या परंपरेशी आपला धागा जोडून लेखन करणार्या आधुनिक संतांच्या विचारांनाही त्यांच्या लेखनात स्थान मिळाले आहे. डॉ. कुलकर्णी यांचा भर समाजधारणेला अनुकूल ठरणार्या व मूल्यप्रधान विचारसरणीला अनुसरणार्या संतविचारांवर आहे. हा वाङ्मयेतिहासाला पूरक ठरणारा व अलक्षित लेखनाकडे अंगुलीनिर्देश करणारा लेखनप्रपंच आहे.