शिवाजीराव पाटील यांची शाहिरी
शिवाजीराव धर्मा पाटील - स्वत:च्या नावात स्वराज्य सामावलेले, सामाजिक बांधिलकी जपणारे, जगाने कर्तृत्व श्रेष्ठ मानले त्या शब्दसरस्वती बहिणाबाई चौधरी यांच्या खान्देश भूमीतील जन्म घेतलेले, त्याच शब्दसरस्वतीचा आशिर्वाद लाभलेले. कर्मभूमीची भाषा अहिराणी, राज्याची भाषा मराठी आणि राष्ट्रभाषा हिंदी या तिन्ही भाषांमध्ये त्यांचा संचार सुरू राहिला. त्याचा दाखला त्यांच्या चार शाहिरी वाङ्मयाच्या पुस्तकांमध्ये मिळणार आहे. शिवाजीराव पाटील यांनी अफजल खान वधाचा तेजस्वी पोवाडा तर लिहिला आहे. मात्र, पोवाड्याच्या विविध विषयांना हात घालून आजच्या सामाजिक वर्तमानाचे पोवाडेदेखील वाखाणण्याजोगे आहेत. ‘न्यायनिष्ठ शिवराय’ या पोवाड्याने त्यांनी खंडोजी खोपडेच्या फितुरीवर पहिला वार केला आहे.
- शाहीर दादा पासलकर, पुणे